(मे २०१० मध्ये लिहिलेला लेख आहे.)
गेले काही महिने मला हॅरी पॉटरने खिळवले होते.
तशी हॅरीशी लांबून ओळख काही वर्षांपासूनची.
परदेशात त्याची कशी क्रेझ आहे, आपल्याकडेही कशा पुस्तकासाठी रांगा लागताहेत हे सारं वाचण्यात आलेलं होतंच..
आणि त्याबरोबर अर्थात "आमचा फास्टर फेणे काही कमी नव्हता, नसती फिरंगी खुळं" हेही वाचत होतो. हे आपण वाचावं असं काही आवर्जून वाटलं नाहीच.
मग सिनेमा आला, आमच्याकडे सीडी आली , (त्याआधी आमच्याकडे मुक्ता आली). पहिल्या भागाचे मराठी भाषांतर पुस्तकरुपाने अवतरले. भाषांतर कसे नसावे यासाठी हे अगदी आदर्श उदाहरण. ते वाचून दाखवताना असे वाक्यावाक्याला खडे लागायचे की गोष्टीचा आनंद घ्यायला जमलेच नाही.
पुढचे भाषांतरित भाग येत राहिले, सिनेमाही आले पण मी त्यापासून लांबच होतो. मुक्ता वाचत होती,पारायणे करत होती, प्रसारही करत होतीच.
जेके रोलिंग ने हार्वर्डमध्ये केलेले भाषण (http://groups.google.com/ group/aksharnandan/browse_ thread/thread/ 21c7a8bb5dd37a06/ 3f63810bbe6be67f?hl=en&lnk= gst&q=fringe#3f63810bbe6be67f) याआधी वाचले होते आणि खूप आवडलेही होते.
काही महिन्यांपूर्वी मी ६वा भाग वाचला (halfblood prince) आणि मग त्या जादूई दुनियेत ओढला गेलो. त्याआधीचे भाग वाचून काढले. आणि या सार्यामधल्या अनुत्तरित प्रश्नांचा ही बाई शेवटच्या भागात कसा निकाल लावते हे कळून घ्यायची जबरदस्त उत्सुकता वाटायला लागली.
मग मी स्वतःच ७वा भाग विकत आणला आणि अधाश्यासारखा वाचून संपवला.
मग पुन्हा आधीचे ६ भाग वाचले. त्यातले कितीतरी दुवे कसे नीट जुळवले आहेत शेवटापर्यंत हे जाणवले.
हॅरी पॉटर पुस्तकमाला ही माझ्या वाचनातील सर्वोत्तम fictions च्या यादीत नक्कीच आहे.
लेखिकेच्या कल्पनेची झेप आणि आवाका हे आपल्याला थक्क करुन सोडतं. एक स्वतंत्र जग तिने आधी मनात आणि मग लिखाणात आकाराला आणलं आहे. त्या जगाचे कायदे, दळणवळण, चलन, शिक्षण, तुरुंग, खेळ, साहित्य, पोशाख, हे सारं अगदी वेगळं. मात्र चांगलं/वाईट याचा विवेक, वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा, त्वेष, मत्सर, कपट, क्रौर्य, महत्वाकांक्षा, पश्चात्ताप हे सगळे भाव आपल्याच जगातले. शेवटी हॅरी जिंकणार हे तर आपल्याला उघडच कळत असतं पण तरीही त्या अपरिहार्यतेकडे जाण्याचा जो प्रवास आपल्याला जेके रोलिंग घडवते तो विलक्षण आहे. एखाद्या रोलरकोस्टरसारखा.. या ७ही भागांमध्ये आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे याचा आराखडा, बारीक तपशीलांसकट तिच्या डोक्यात नक्कीच तयार होता हे तर वाचता वाचता सहज जाणवतं. पहिला भाग गाजला म्हणून लिहा अजून एक असे हे नक्कीच नाहीये.
या कथेत एक सूत्र सारखं आपल्या समोर येतं.. हॅरी, रॉन आणि हर्माईनी यशस्वी होतात ते श्रेष्ठ कौशल्यामुळे, दैवी देणगीमुळे नव्हे तर प्रेम, पश्चात्ताप, मैत्री, क्षमा या मूल्यांना सहजपणे आचरणात आणल्यामुळे. ही मूल्ये इतकी श्रेष्ठतम आहेत हे सार्या वाचकांच्या मनावर छान ठसतं. काहीकाही वाक्यं अशीच चमकावून जातात. "आपण भविष्यात कुठे असू ते ठरतं ते आपल्याकडच्या क्षमता, गुणांपेक्षाही आपण ज्या निवडी करतो त्यावर.."
शेवटच्या टप्प्यावर हॅरीला मृत डंबलडोर भेटतात, हॅरी त्यांना विचारतो, हे खरं आहे का माझ्या मनात घडतं आहे ? त्यावर ते उत्तरतात, अर्थात हे ते तुझ्या मनात घडतं आहे पण म्हणून ते खरं नाही असंही नाही...
या आणि अशा अनेक पैलूंमुळे हॅरीने मला खिळवून ठेवलं होतं..
पण हॅरी पॉटर खोलवर जाउन भिडण्याचं कारण यापेक्षा वेगळंच आहे.
वाचन हे आपले वेड आपल्या मुलांनाही लागावे, भान हरपून त्यांनी या अक्षरांच्या जगात हरवून जावे हे तर माझे कधीचेच स्वप्न.... आपल्या मर्मबंधातील ठेवींचा खजिना आपण त्यांच्यापाशी खुला करावा, त्या ठेवी त्यांना ’त्यांच्या’ वाटाव्यात ही आस ही त्या स्वप्नाचीच पुढची पायरी.. आणि या वाटेने जाताना एक वळण असे यावे की त्यांना त्यांचे स्वतःचे आपल्याआधी काही नवीन गवसावे आणि ती त्यांची ठेव कौतुकाभिमानाने आपण आपलीसी करावी हा त्या स्वप्नाचा उत्कर्षबिंदू.
अपेक्षेपेक्षा कितीतरी आधीच मुक्ताने माझी ही सारी स्वप्नं सत्यात आणली.
माझ्यासाठी हॅरी म्हणून जवळचा आहे.
परदेशात त्याची कशी क्रेझ आहे, आपल्याकडेही कशा पुस्तकासाठी रांगा लागताहेत हे सारं वाचण्यात आलेलं होतंच..
आणि त्याबरोबर अर्थात "आमचा फास्टर फेणे काही कमी नव्हता, नसती फिरंगी खुळं" हेही वाचत होतो. हे आपण वाचावं असं काही आवर्जून वाटलं नाहीच.
मग सिनेमा आला, आमच्याकडे सीडी आली , (त्याआधी आमच्याकडे मुक्ता आली). पहिल्या भागाचे मराठी भाषांतर पुस्तकरुपाने अवतरले. भाषांतर कसे नसावे यासाठी हे अगदी आदर्श उदाहरण. ते वाचून दाखवताना असे वाक्यावाक्याला खडे लागायचे की गोष्टीचा आनंद घ्यायला जमलेच नाही.
पुढचे भाषांतरित भाग येत राहिले, सिनेमाही आले पण मी त्यापासून लांबच होतो. मुक्ता वाचत होती,पारायणे करत होती, प्रसारही करत होतीच.
जेके रोलिंग ने हार्वर्डमध्ये केलेले भाषण (http://groups.google.com/

(मे २०१०)