Monday, 21 June 2010

चिन्ना

चिन्ना

चिन्ना हा भिल्या आणि मोगी या आदिवासी जोडप्याचा एकूलता एक मुलगा. तो त्याच्या आईला माय व वडिलांना बापूस म्हणतो. हा चिन्ना साधारण ४थी-५वीतला मुलगा. आदिवासी पाड्यातील आश्रमशाळेत ३री पर्यंत तो शिकलेला आहे पण पुढे शिकायची सोय नसल्याने त्याची शाळा सुटली. आणि झालं! त्याच्या मुळच्या खोडकर स्वभावाला बुद्धीची जोड मिळाली आणि झाल्या त्याच्या खोड्या सुरू! पण त्या खोड्यांमधून काहीतरी चांगलं निघतं बरं का? चिन्नाच्या त्या गमती-जमती या पुस्तकात आहेत.

या पुस्तकात एकूण सहा गोष्टी आहेत..
१. खोडकर चिन्ना.......
२. चिन्नाची फजिती.......
३. चिन्ना आणि शिकारी.........
४. कल्पक चिन्ना.........
५. चिन्नाची चतुराई.........
६. नरभक्षकाशी झुंज.........

यातील मला कल्पक चिन्ना ही गोष्ट खूप आवडते. या गोष्टीत चिन्नाची गाठ असते खुद्द " कुप्रसिध्द चंदनचोर वीरप्पन " याच्याशी! जंगलातील सात चंदनाची झाडे चोरील जाऊ नयेत म्हणून चिन्नाने केलेली खटपट खरोखरच अदभूत आहे. ही गोष्ट पुन्हा पुन्हा वाचली तरी कंटाळा येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे काहितरी वेगळं वाचायला आपल्याला आवडतं. या पुस्तकातील भाषा, वातावरण, एकमेकाशी असलेले संबंध हे सर्वच वेगळे असल्याने वाचायला छान वाटते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच चिन्ना एका उंच झाडावर चढून बसलेला आहे. व मागून पक्षी उडत आहेत असे चित्र आहे. मंजुश्री गोखले यांचे हे पुस्तक जरूर वाचण्यासारखं आहे!

चिन्ना

लेखिका- सौ. मंजुश्री गोखले
प्रकाशन- जोत्स्ना प्रकाशन
चित्रकार- पुंडलीक वझे
पृष्ठ क्रमांक- ७०
किंमत- २५ रू.

4 comments:

अश्विनी said...

मस्त!

विद्या कुळकर्णी said...

छान!
या पुस्तकाची भाषा वेगळी आहे का?
आदीवासी बोलीतले शब्द वापरले आहेत का?

Gautami said...

खरंच, हे पुस्तक छान आहे.त्यातून थोडी आदिवासी भाषा देखील समजते. परिक्षण मस्त!
-गौतमी

वैशाली said...

मुक्ता हे पुस्तक आमच्याकडे पण आहे. त्याचे मुखप्रुश्ठ मला पण आवड्ते.