
तोत्तोचान ही गोष्ट आहे एका लहान मुलीची. काही निरागसतेने केलेल्या खोड्यांमुळे तिची शाळेतून हाकलपट्टी होते. मग तोमोई तिला आधार देते. तिथली धम्माल ,रेल्वेचे डबे , डोंगरावरचं, समुद्रावरच खाणं या सार्याशी तोत्तोचान केव्हाच एकरूप होते. तिचे आवडते शिक्षक असतात मुख्याध्यापक सोसाकु कोबायशी हे असतात. " तुम्हाला माहितीये तुम्ही सर्व एक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही रहा. कुठलही काम करा पण तुम्ही सर्व एक आहात". असं ते नेहमी सांगत. तोत्तोचानच्या व तोमोईच्या या छोट्या छोट्या गोष्टी मिळूनच हे पुस्तक तयार झालं आहे.
या पुस्तकात वेळोवेळी दिलेली चित्रही खूप सुंदर आहेत. एकूणच हे एक परिपूर्ण पुस्तक आहे, लहान मोठे सर्वांनी वाचावं असं! मला यातल्या काही गोष्टी फार आवडतात. उदा.
" वेण्या", "सगळं पुन्हा आत टाक", "तोत्तोचानचं नाव", "पोह्ण्याचा तलाव" इ. या सर्वच गोष्टी खूपच अप्रतिम आहेत असं नाही पण त्या आपल्याशा वाटतात. म्हणूनच तोत्तोचान सगळ्यांना आवडते.
कारण आपण तसं कधीतरी वागलेलो असतो/ आपल्याला तसं वागायचं असतं. तोत्तोचान का आवडलं याला खरं तर स्पष्ट असं उत्तरच नाहिये. मी ते वाचलं आणि मला ते मनापासून आवडलंय. तोत्तोचान मधला अजून एक शब्द मला खूप आवडतो, तो म्हणजे " नै " आपण साधारणः "नाही का", असा शब्द वापरतो पण हा शब्दच जास्त निरागस वाटतो नै?
तोत्तोचान मला वाचायला खूप आवडलयं आणि तुम्हालाही आवडेल याची मला खात्री आहे!
तोत्तोचान
मूळ लेखिका- तेत्सुको कुरोयानागी
अनुवादिका- चेतना सरदेशमुख गोसावी
पानं- १३०
किंमत-४० Rs.
3 comments:
"तोत्तोचान का आवडलं याला खरं तर स्पष्ट असं उत्तरच नाहिये. मी ते वाचलं आणि मला ते मनापासून आवडलंय."
क्या बात है !
मुक्ता, खुपच छान लिहिलं आहेस.
”आपण तसं कधीतरी वागलेलो असतो/ आपल्याला तसं वागायचं असतं. ”
वा! कधीपासून गं इतकं कळायला लागलयं?
mala ata te punhaa vachavase vatayala lagley
Post a Comment