हातात रबराचा चेंडू घेऊन रस्त्यावरुन चालत निघालेल्या कोणत्याही पोराकडं पाहत राहायचं. तो पोरगा एखाद्या घराच्या किंवा कोणत्याही भिंतीसमोर आला की आणखीनच नीट पाहायचं त्या पोराकडं. तो पोरगा इकडं तिकडं न पाहता एक गोष्ट सरळ, सणसणीत करणार. कोणती ? हातातला चेंडू तो एकदम जोरात समोरच्या भिंतीवर फेकणार. भिंतीवर ’पॉक’ करुन आपटलेला तो चेंडू आपल्याच हातात पुन्हा झेलणार आणि मगच पुढं जाणार. खात्रीच.
-------------
घसरगुंडी वरुन घसरताना डोळे सणसणीत उघडे ठेवा. नाही तर किलकिले करा. छानच वाटणार. एकदा वाटणार, बाकीचं सगळं तसंच आहे. आपणच फक्त खाली खोल खोल निघालो आहोत. एकदा वाटणार, आपण आहोत तिथंच आहोत, बाकीचं सगळं जग हळू हळू वर यायलंय.
अशी ती घसरगुंडी.
जगाची पातळी की काय ती खाली-वर करायला लावणारी.
मला आवडलीच ती.
------------------------------------------------------------------
हे तर तंतोतंत माझं वर्णन असं वाचणार्या प्रत्येकाला वाटून सोडणारा हा बेष्टं लेखक म्हणजे प्रकाश नारायण संत.
शारदासंगीत हा त्यांचा दुसरा कथासंग्रह.
लंपन या एका संवेदनाशील मुलाच्या या गोष्टी. त्याच्याबरोबर यात त्याचे आजी-आजोबा आहेत, बाबूराव आहे, चंब्यासारखे मित्र आहेत, सुमी आहे. ग्राउंड आहे, रुळ आहेत, विहिर आहे, शाळा आहे.
वाचक जर लंपनच्या वयाच्या आसपास असेल तर लंपनच्या खांद्यावर हात टाकून या सगळ्या गोष्टींमध्ये रमून जाईल, जर तरुण, प्रौढ, वृद्ध असेल तर या सगळ्या गोष्टींमधून अलगद स्वतःच्या मॅड दिवसांमध्ये जाउन पोचेल, त्या आनंदाची पुन्हापुन्हा आठवण काढेल आणि हे सारं कधी हरवलं आपल्यातलं म्हणून हळवा/कातरही होईल कोणी.
या संग्रहात ५ दीर्घकथा आहेत. मला यातील शारदासंगीत ही कथा खूप आवडते. शारदासंगीत विद्यालयात नाव घातल्यापासून ते मास्तरांच्या गैरहजेरीत क्लास घेण्यापर्यंत लंपनची ही गोष्ट. त्या प्रवासात त्याला काय काय नीटच कळतं. आणि त्याच्याबरोबर आपल्यालाही.
परचक्र, आगगाडीच्या रुळांवर, रानी का बाग, घसरगुंडी या बाकीच्या चार कथा.
आपल्या लेखनाबद्दल संतांच्याच शब्दात सांगायचं तर..
मनाच्या कोपर्यातील एका हळव्या जगाचं दर्शन घडवणारं हे माझं लेखन.
नाद, गंध, रंग आणि स्पर्श अशा विविध माध्यमांतून त्या वयातील मुलाच्या नव्या कोर्या मनाला भिडणारे हे पहिलेवहिले अनुभव, आणि त्यांतून उमटणारी अतिसूक्ष्म संवेदनांची ती धावती वलयं. मनात खोल कुठेतरी झिरपून राहिलेलं हे सर्व कधीतरी अचानकच वरती उफाळून आलं आणि येतच राहिलं.
शारदासंगीत
लेखक : प्रकाश नारायण संत
मौज प्रकाशन
किंमत : १०० रु.
पाने : १६२
Wednesday, 26 May 2010
Thursday, 13 May 2010
झाडं लावणारा माणूस
१९१३ साली आल्प्सच्या पर्वतीय प्रदेशात लेखक फिरत असताना तो प्रदेश अतिशय उजाड असतो. झाडे नाहीत, पाणी नाही. गावे ओस पडलेली. अशा प्रदेशात खूप पायपीट केल्यावर लेखकाला एक मेंढपाळ भेटतो. लेखक त्याच्याबरोबर दोन दिवस राहतो. हा मेंढपाळ एकटा राहात असतो. रोज निवडून १०० सफेद्याच्या बिया तो माळावर जाऊन पेरत असतो.तो प्रदेश झाडांविना मरणपंथाला लागला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्या परीस्थितीत सुधारणा करण्याची जबाबदारी त्याने घेतली होती. तोपर्यन्त त्याने एक लाख बिया पेरल्या होत्या, त्यापैकी दहा हजार झाडे वाढतील असा त्याचा अंदाज होता. लेखक म्हणाला की, त्यापुढील तीस वर्षात ही दहा हजार झाडे छान फोफावतील. त्यावर सहजपणे तो म्हणाला की त्यापुढील तीस वर्षात मी इतकी झाडे लावलेली असतील की दहा हजार झाडे म्हणजे समुद्रातला एक थेंब ठरेल. पुढे खरोखरच बीच वृक्ष लावले, ओक लावले भूर्जपत्र लावली. जंगलच्या जंगल ह्या माणसानं उभं केलं. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. झरे वाहू लागले, हवासुद्धा बदलली. त्यामुळे लोक त्या परीसरात राहायला येऊ लागले, गावं वसली. १९४५ साली तिथे राहणार्या दहा हजारांहून जास्त माणसांच्या सुखाचं कारण आहेत--एलझेआर बुफिए
एकट्या माणसाने आपलं शरीर आणि मानसीक सामर्थ्य यांच्या जोरावर वैराण वाळवंटाचं नंदनवन केलं.
हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.
एक माणूस एकुलत्या एक आयुष्यात काय करू शकतो याचं हे अविश्वसनीय उदाहरण आहे. आपण पुस्तक वाचत जातो आणि या माणसापुढे नतमस्तक होतो. एका माणसाची कमाल ताकद काय असू शकते!!!
हा बोलका, शिकलेला, हुशार माणूस नाहीये. हा एक फार फार शहाणा माणूस आहे. (आपल्या आजूबाजूची अबोल, चटपटीत बोलू न शकणारी माणसं आतून शहाणी असू शकतात, हे आपण लक्षात ठेवू या, का?) निसर्गाची बिघडलेली व्यवस्था पूर्वपदावर आणण्याचं त्याने ठरवलं. हे त्याचं स्वप्नच किती मोठं आहे. ते त्याने प्रत्यक्षात आणलं.
त्याला एक सलाम!
'झाडं लावणारा माणूस' , लेखक-जॉं जिओनो
अनुवाद--माधुरी पुरंदरे , राजहंस प्रकाशन
किंमत--२५ रू. , पाने--३५

Monday, 10 May 2010
मोठया रानातले छोटे घर
नमस्कार! या ब्लॉगवर आवर्जून आलात त्याबद्द्ल धन्यवाद! ही पहिली दोन वाक्य लिहिण्याचे कारण म्हणजे या ब्लॉगवर कविता, हव्या त्या विषयाचे लेखन नसून फक्त पुस्तकांबद्द्लचे लेखन असेल.
त्यातला हा माझा पहिला लेख. पुस्तकाचे नाव " मोठया रानातले छोटे घर ". आता मी तुमचा वाचनाचा वेळ न दवडता सुरूवात करते,
मोठया रानातले छोटे घर हा " लॉरा इन्गाल्स वाईल्डर" यांच्या कादंबरीचा भा.रा. भागवत यांनी केलेला अनुवाद. विसकॉन्सिन च्या मोठ्या रानातील एका छोट्या लाकडी घरात रहायचे लॉरा, तिची आई कॅरोलिन, तिचे बाबा चार्लस, तिची बहीण मेरी आणि तिची कुक्कुली बहीण कॅरी. त्यांच्या आई-बाबांना त्या मा आणि पा असं म्हणायच्या. या इन्गाल्स कुटुंबाच्या गमती-जमती या पुस्तकात आहेत.
लॉरा नि मेरी जवळपास सारख्या वयाच्या पण मेरीचे केस मात्र सोनेरी आणि लॉराचे काळे! दोघी रोज आईला कामात मदत करत. मेरी मोठी असल्याने ती जास्त भांडी पुसायची, पण लॉरा मात्र स्वतःचा वाडगा, ताट्ली काळजीपूर्वक पुसायची. माचं [ आईचं ] या कामांबद्द्ल एक गाणं असे -
धुणी धुवा सोमवारी
इस्त्री करणे मंगळवारी
शिवणे टिपणे मग बुधवारी
ताक घुसळणे गुरूवारी
साफसफाई शुक्रवारी
भट्टी लावू हो शनिवारी
आराम करावा रविवारी!!!
पा [ बाबा] छान फिडल वाजवत. ते कायम मजेशीर गाणी वाजवत. ती गाणी ऐकताना लॉरा टाळ्या वाजवे. ते गोष्टीपण छान सांगत. कधी त्यांच्या वडिलांच्या तर कधी अस्वलांच्या! कधी त्यांच्या मूर्खपणाच्या तर कधी भीतीदायक अनुभवाच्या! कधी शहराच्या तर कधी साखरी बर्फाच्या, तेव्हाच्या नाचाच्या! दर रात्री सगळं काम झाल्यावर त्याच्या फिडलवादनाचा कार्यक्रम होई. आणि कधी मुलींना काही उपदेश करायचा असेल किंवा तुम्हाला असं वाटतं यात काही वेगळं नाही समजवायचं असेल तर ते आपल्या पोतडीतून गोष्टी बाहेर काढत.
अश्या या कुटुंबाचे विसकॉन्सिन च्या मोठ्या रानातील दिवस, तेव्हा घडलेल्या घटना या पुस्तकात आहेत. या पुस्तकाला विशेष कथा नाहीये. पण हे पुस्तक मनात "घर" करतं. पांचं अस्वल समजून लाकडाला मारणं, आत्याला मेरीच्या सोनेरी केसांमुळे तुला तीच आवडते नं? असं लॉराचं विचारणं यावर आपल्यालाही खदखदून हसू येतं. हे पुस्तक आपल्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत हमखास नाव पटकावतं....
" मोठया रानातले छोटे घर "
लेखिका- " लॉरा इन्गाल्स वाईल्डर"
अनुवादक- भा.रा.भागवत
प्रकाशन - राजा प्रकाशन
किंमत - १०० रू.
हे पुस्तक जरूर वाचा!

Subscribe to:
Comments (Atom)